Views


*सकल मराठा समाज च्या कळंब बंद आव्हानाला 100% प्रतिसाद.*         




कळंब (प्रतिनिधी)


मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने त्यांना दिलेले आश्वासने पूर्ण करावेत या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे याच्या समर्थनार्थ ‌ सकल मराठा समाज यांच्यावतीने कळंब शहर बंदची हाक देण्यात आली होती अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालय व सर्व धर्मीय व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली प्रतिष्ठान बंद ठेवली व या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला व आजचा हा बंद कळंब तालुक्याच्या परंपरेनुसार शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यास सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्यावतीने प्रशासनाचे व व्यापारी बांधवांनचे आभार व्यक्त करण्यात आले.
माननीय तहसीलदार साहेब कळंब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात आजचा हा बंद मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाळण्यात आला आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर साल्हेर किल्ल्यावर जो प्राण घातक हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याचीही सखोल चौकशी करून यामागे असलेल्या मास्टरमाइंड यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व गुन्हेगारांना अटक करावी ,
तसेच शासनाने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून सागे सोयरे ची व्याख्या निश्चित करून मनोज दादा जरांगे पाटील यांना दिलेली सर्व आश्वासने तात्काळ पूर्ण करावी व मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारने तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन गांभीर्याने प्रयत्न करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेंत. निवेदन देण्यासाठी
कळंब शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top