Views


*वंचित बहुजन आघाडी कळंब मध्ये कुणाल दादा मस्के यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश प्रविण दादा रणबागुल यांच्या उपस्थितीत केला*


कळंब/ प्रतिनिधी
  
 शहरातील शुभमंगल कार्यालय येथे वंचित बहूजन आघाडी कळंब तालुक्यामधील लाॅयन्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दादा मस्के यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कांबळे यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी मनोगत व्यक्त करताना मा अ‍ॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश करताना बहूजन दलित ओबीसी मुस्लिम समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्याचे आश्वासन कुणाल दादा मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण दादा रणबागुल यांनी या देशात व महाराष्ट्रातील होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तसेच भाजप नेते आमदार यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार तसेच मराठा समाजातील लोकांवर मराठा आरक्षण संदर्भातील मोर्चा वर गोळीबार व लाठीमाराचा निषेधार्थ तसेच महाराष्ट्र राज्यातील शासनकर्ते यांनी आपली जबाबदारी म्हणून गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा देणे योग्य आहे असे म्हणाले या हुकुमशाही ने महाराष्ट्र व संपुर्ण लोक अत्यंत भीतीने जगत आहेत असे वाटते या परिस्थितीला बदलायचे असेल तर मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन केले या वेळी धाराशीव जिल्हा प्रभारी मराठवाडा महासचिव अ‍ॅड रमेश गायकवाड सर जिल्हा प्रमुख बी डी शिंदे जिल्हा नेते अनिल हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेले युवक जिल्हा प्रमुख शितल चव्हाण जिल्हा प्रवक्ते प्रा के टी गायकवाड अरविंद खांडके अरुण गरड श्रीकांत राऊत डि टी वाघमारे शिवाजी कांबळे
 
Top