*मुस्लिम समाजाला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजूर करावा --आ.ज्ञानराज चौगुले यांची अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी*
लोहारा/प्रतिनीधी
उमरगा लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार आवश्यक महत्त्वाच्या कामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आ.ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विभाग मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे दि.24 रोजी मुंबई येथे केली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असुन त्यांच्यातून मुस्लिम कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधकाम करणे, मुस्लिम वस्त्यांमध्ये शादीखाना, सभागृह बांधकाम करणे, कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता करणे, यांसह विविध मूलभूत सुविधा पुरविणेबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे मागण्या आलेल्या आहेत. या अनुषंगाने सदर कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाककडून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे. यापूर्वीही आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांतील मुस्लिम समाजबांधवांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या निधीतून गावोगावी अनेक विकासकामे पूर्ण झाली असुन काही कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत.