Views


*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ्त्रपती संभाजीनगर यांच्या वतीने लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त*



लोहारा/प्रतिनीधी


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ्त्रपती संभाजीनगर कडून शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा या महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी अजय शिंदे, रासेयो संचालक महाराष्ट्र व गोवा, प्र.कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.सोनाली क्षीरसागर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे यांचे कौतुक केले जात आहे.याबद्दल डॉ.बालाजी राजोळे, डॉ. मनोज सोमवंशी, डॉ.विनायक पाटील, डॉ.भैरवनाथ मोटे, डॉ.शिवाजी कदम, डॉ.प्रभाकर गायकवाड, डॉ.विनोद आचार्य, डॉ.रामेश्वर धप्पाधुळे, डॉ. रामहरी सूर्यवंशी, डॉ.सूर्यकांत बिराजदार, प्रा.दत्ता कोटरंगे, डॉ.संदीप कोरेकर, डॉ.छाया कडेकर, डॉ.पार्वती माने, प्रा.नितीन आष्टेकर, प्रा.प्रियंका गिरी, शिक्षकेतर कर्मचारी मनोज पाटील, बालाजी सगर, डॉ.शिरीष देशमुख, नंदकिशोर माने, प्रवीण पाटील, प्रकाश राठोड, संजय फुगटे व परमेश्वर कदम यांसह महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top