Views


*शिवशाहीर संतोष साळुंखे निर्मित महिला शाहीर पथकाने पोवड्यातून रसिक श्रोत्यांची मने जिंकली*   कळंब (प्रतिनिधी)


शिव सेवा तालीम संघ कळंब आयोजित सकल शिवजयंती उत्सव समितीच्या च्या वतीने शिवशाहीर संतोष साळुंखे निर्मित महिला शाहीर पथकाचा आम्ही जिजाऊंंच्या लेकी कार्यक्रम दिनांक ११ फेब्रुवारी रोजी अहिल्याबाई होळकर चौक कळंब येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी मंचावर सकल शिवजयंती महोत्सव समिती चे मार्गदर्शक शिवाजी आप्पा कापसे ,शिवशाहीर निशिगंधा संतोष साळुंखे व प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित पत्रकार तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे ,बालाजी बप्पा अडसूळ ,विलास मुळीक, बालाजी सुरवसे ,माधवसिंग राजपूत, संभाजी गीड्डे मंगेश यादव ,रमेश अंबिरकर: अकिब पटेल, ओंकार कुलकर्णी, समीर मुल्ला ,शिवप्रसाद बियाणी ,अविनाश घोडके यांचा शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कला पथकाच्या प्रमुख निशिगंधा साळुंखे यांनी याप्रसंगी बोलताना स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माॕसाहेब व शिव विचारांची पेरणी व्हावी यासाठी कला पथकाच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याचे सांगून कळंब शहरात शिवजयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो या भव्य कार्यक्रमाची सुरुवात आमच्या शाहिरी कला पथकाच्या कार्यक्रमाने होत आहे याचा आनंद वाटतो असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात जय - जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ! या महाराष्ट्र गीताने करण्यात आली यानंतर जिजाऊ माॕसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर त्याग मूर्ती रमाबाई ,झाशीची राणी यांचे स्फूर्ती गान करत आम्ही जिजाऊच्या लेकी.... गाथा शिवरायांची.... शिवरायांचा पाळणा.... झाला शत्रूचा कर्दन काळ.... माझा जिजाऊ चा बाळ ....उगवला तारा.... प्रतापगडचा रणसंग्राम.... अंधार फार झाला... या गीतातून अंगावर शहारे उभे करणारे पोवाडे सादर करीत उपस्थितांची मनी जिंकली या कार्यक्रमात शेवटी प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या पहाडी आवाजात पोवाडे सादर केले छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले असे सांगितले व रसिक श्रोत्याकडून कडून टाळ्यांच्या कडकडात भरभरून दाद मिळविली या कलापथकात निशिगंधा साळुंखे ,जानकी अवताडे ,अपेक्षा लाटे, गायत्री जाधव ,स्नेहा शेवाळे ,सायली पंडित तर संगीत साथ संगत विश्वजीत पांचाळ, मनोज शिवलकर, खंडू दादा यांचा समावेश होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट ,रमेश शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल शिवजयंती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम, उपाध्यक्ष गणेश भवर, प्रताप शिंदे , सचिव नामदेव पौळ ,, शिवकुमार खबाले, संजय होळे,गोविंद चौधरी, सुरेश शिंदे ,गोकुळ शेळके, शाम नरवडे ,मनोज कदम, गोलू कापसे, बालाजी कापसे ,निखिल यादव, विशाल वाघमारे अशोक गरड यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

 
Top