Views


*जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न*



लोहारा/प्रतिनीधी


लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात रविवारी (ता.२१) गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी पंचक्रोशीतील सर्व स्तरातील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अध्यापही मठ परंपरेला महत्त्व आहे. पूर्वी बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ हे भूकंपानंतर नव्याने पुनर्वसित जेवळी गावात जवळपास दीड कोटी रुपये लोक वाट्यातून बांधले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रविवारी (ता.२१) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी साह वाजता येथील श्री विरभद्र मंदिरात रूद्राभिषेक, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, मठाधिश म.नी.प्र.गुरु गंगाधर महास्वामीजींना सदभक्तांकडून महावस्त्रे प्रधान, दहा वाजता परिसरातील आठ ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा समाज उपयोगी विशेष काम केलेल्या बद्दल सत्कार करण्यात आला, या नंतर भाविकांना श्री गुरू गंगाधर महास्वामीजी यांचे आशीर्वाद झाले, सकाळी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील सात ते आठ हजार भाविक भक्त दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित होते. या प्रसंगी दिवसभरात उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, जिल्हा परिषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक ॲड.दिपक जवळचे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, महावितरणचे निवृत्त उप अभियंता वीरपक्ष स्वामी, पंचायत समिती माजी सभापती बुद्धिवंत साखरे साखरे, माजी पं.स.उपसभापती व्यंकट कोरे, राजेंद्र माळी, सरपंच वैभव पवार, उपसरपंच बसवराज कारभारी, पंचायत समितीचे माजी सदस्य उल्हास घुरघुरे, नगरसेवक अविनाश माळी, आदींनी गुरुपोर्णिमा निमित्त उपस्थित राहत आशिर्वाद घेतले या उत्सवासाठी सीमावर्ती कर्नाटक- महाराष्ट्र भागातील विविध गावातून नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, संजय तांबडे, शिवराज चिनगुंड्डे, महादेव मोघे, सत्येश्वर कारभारी, शिवशरण कारभारी, योगीराज सोळसे, महादेव सारणे, बाळासाहेब कटारे, रोहित कारभारी, महादेव कार्ले, राजेंद्र स्वामी, किसन खोत, सुभाष सारणे, राजेंद्र डिग्गे, विजय हावळे, मुन्ना भैराप्पा, बसवराज स्वामी आधी परिसरातील भाविक भक्तांनी तन मन धनाने पुढाकार घेतला होता.
 
Top