Views
*बीटस्तरीय कब्बडी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी ची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड*


कळंब/ प्रतिनिधी 


 जिल्हा परिषद उस्मानाबाद शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इटकुर येथे चालू असलेल्या बीटस्तरीय विविध खेळाच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी शाळेच्या मुलींच्या संघाने 14 वर्ष वयोगटात कब्बडी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदोरा शाळेच्या संघाचा फायनल मद्ये पराभव करत तालुकास्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

  या यशाबद्दल यशस्वी संघाचे गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर साहेब,शिक्षण विस्ताराधिकारी सुशील फुलारी, धर्मराज काळमाते साहेब, केंद्रप्रमुख गामोड साहेब, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशीव , केंद्रीय मु.अ. शारदा मुंडे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांभीरवाडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अद्यक्ष औदुंबर माने , गंभीरवाडी गावचे गोडगे शिवाजी गोडगे यांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन केले.

  या विजयी संघात कर्णधार वैष्णवी देवकर, कल्याणी गोडगे, पल्लवी काळे, श्रेया गंभीरे, प्रगती गंभीरे, तृष्णा देसाई,सोनाक्षी आडसुळ,गौरी नलवडे, गौरी गोडगे,प्रीती देवकर,स्वप्नाली आडसूळ, प्रतीक्षा सुतार या विद्यार्थिनीचा समावेश होता.

    या विद्यार्थ्याना सहशिक्षक पांडुरंग टेळे,हरिभाऊ मोरे, विक्रम गरड, महादेव खराटे,मई डांगे,कोंडाबाई भंडारे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे


 
Top