Views
*भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

कळंब/ प्रतिनिधी सामाजिक कार्यामुळे कळंब शहर व पंचक्रोशीत परिचित असणारे भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम घेत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी खडकी व ईटकुर येथील ग्रामपंचायतच्या वतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. 

कन्हेरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच डिकसळ येथील संत रामचंद्र बोधले महाराज विद्यामंदिरात देखील पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्या समावेत साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, दप्तर यासारख्या शैक्षणिक साहित्याची वाटप करून मुलांना खाऊ देण्यात आला.शाळेच्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी देखील अजित पिंगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी डिकसळ येथील ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला,सौ. इर्शाद सय्यद, आनंद बोराडे, माजी सरपंच नामदेव जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, संतोष कस्पटे गणेश त्रिवेदी, जीवेश्वर कुचेकर, सुजित लिमकर, पोपट अंबिरकर, बबलू ठोंबरे, इम्रान काझी, रफिक सय्यद,अनंत अंबिरकर, बालाजी स्वामी, छोटू शिंगणापूर, अभय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top