Views


*दयावान प्रतिष्ठान च्या वतीने हाक तुमची साथ आमची अभियान*

कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील व शहरातील नागरिकांना शासकीय निमशासकीय कार्यालयात शुल्क शुल्क कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना नाहक मानसिक आर्थिक त्रास पासून मुक्त करण्यासाठी कळंब च्या दयावान प्रतिष्ठान च्या वतीने हाक तुमची साथ आमची अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे असे दयावान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी नागरिकांना आवाहन केले आहे 

अट एकच,काम कायदेशीर असावे. एखादा कागद कमी असेल तर घाबरून जायची गरज नाही,तो काही गुन्हा नाही. आपण कायदेशीर प्रक्रिया करून,प्रसंगी माहिती अधिकार कायद्याने माहिती काढून कागद मिळवू. अशी त्रुटी असली तरी काळजीचे कारण नसते. कुणी विनाकारण चकरा मारायला लावत असेल किंवा लाच खाण्यासाठी जाणून बुजून त्रास देत असेल तर आपण अशा लोकसेवकास अद्दल घडवू. काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, कायदेशीर बाबतीत काम झाले नाही तर मी देखील तुमच्यासोबत रस्त्यावर आंदोलनास असेल,ह्याबाबत निश्चित हमी बाळगा. धर्मादाय रुग्णालयात पिवळे राशन कार्ड धारकास मोफत इलाज मिळवण्यासाठी आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत शेतकऱ्यांना पांढरे कार्ड असले तरी, इतर सर्वाँना केशरी अथवा पिवळे कार्ड असेल तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी admit करण्यापूर्वी मला एक फोन करा. मोफत इलाज मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. 

बाकी सदैव तुमच्यासोबत! 
हाक तुमची साथ आमची
दयावान प्रतिष्ठान कळंब


चौकट

 हाक तुमची साथ आमची,कुठल्याही सरकारी कार्यालयात, तलाठी,पोलीस स्टेशन,तहसीलदार, राशन दुकान,ग्रामसेवक, नगरपालिका,रुग्णालय, अगदी कुठेही काहीही काम अडले तर तुम्ही मला सरळ फोन करू शकता. 


 इम्रान नजमुद्दिन मुल्ला 
दयावान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कळंब
तथा डिकसळ ग्रामपंचायत सदस्य


मोबाईल नंबर ..9696701111
व्हॉट्स ॲप..9421873111
 
Top