*मतदानाच्या पूर्वसंध्येला संवेदनशिल गावामध्ये पोलिसांचा रूट मार्च*
*आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे - सहा.पोलिस अधीक्षक एम रमेश*
कळंब /प्रतिनिधी
तालुक्यातील तीस गावांमध्ये उदया मतदान होणारं आहे त्या अनुषगाने पोलीस दलातर्फे आज तीस गावापैकी खामसवाडी शिरढोण आणि डिकसळ या गावांमधून आज दि. 17 रोजी रूट मार्च काढण्यात आला आदर्श आचासंहितेचे सर्वांनी पालन करावे तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क शांततापूर्ण पद्धतीने बजावावा असे आवाहन कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. एम रमेश (आयपीएस) सर यांनी केले
या रूट मार्च करिता कळंब पोलिस ठाणे, शिरढोण पोलिस ठाणे, तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.