Views


*कळंब तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी चुरशीने झाले मतदान*

कळंब/प्रतिनिधी


तालुक्यातील ३० ग्रांमपयतीसाठी रविवारी (दि.१८) १२७ मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात चुरशीने मतदान झाले. सकाळी गुलाबी थंडी आठ वाजता मतदान केंद्रावर रांगा लागण्यास सुरुवात केली. त्यानंतर अकरा वाजल्यानंतर मात्र मतदारांनी थंड प्रतिसाद मिळाला. 

सरपंचपदासाठी ८८ तर २८२ सदस्यांसाठी ६५७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.गावचा कारभारी कोण हे मंगळवारी निकाल घोषित झाल्यानंतर कळणार

निवडणूक प्रक्रिया सुरळीत शांततेत होण्यासाठी १२७ मतदान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक अधीक्षक एम रमेश यांनी सवंदेनशिव मतदान केंद्रावर जातीने लक्ष देत स्वतः हजर राहून अनुचित प्रकारावर बंधन घातले.सर्वत्र शांततेत मतदान पार पडले 
 
Top