Views

*बसस्थानका समोरील अतिक्रमणातून अस्थापना धारकाला जीवे मारण्याची धमकी, देणाऱ्या वर गुन्हे नोंद होणार का?*

कळंब/प्रतिनिधी 


         बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. अजून काही राजकीय नेते मंडळीच्या मदतीने गुंड प्रवृत्ती च्या मदतीने अतिक्रमण करण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानी विविध व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांना गाळे भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. दिनांक ११ डिसेंबर रविवारी रोजी बस स्थानक अस्थापना धारक अकीब नय्युम पटेल यांच्या मोबाईल शॉपीच्या दुकानासमोर काही गुंडप्रवृत्ती च्या लोकांनी जबरदस्तीने पान टपरी टाकण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. बस स्थानकासमोरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच ऐरणीवर आला असून त्याबाबत प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेण्यास अद्यापही तयार नाहीबस स्थानकातील आस्थापनाधारक नुसते भाडे भरूनत्यांच्यावर सध्या उपासमारीची पाळी आली आहे . त्या संदर्भातील तक्रार अकिब पटेल यांनी कळंब पोलीस ठाणे येथे दाखल केली असून पोलीसांनी संबधीता विरोधात एन.सी.आर. दाखल करण्यात आलेला आहे. तर तर यांच्या विरुध गुन्हा च नोंद करावा व बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी अकिब पटेल यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीवर प्रसाद करवलकर, विलास मुळीक, डी. बी.उमाप, एम.जे.लोहकरे, मनोज भोसले, विशाखा भोगले, राजाभाऊ चालक व बाळासाहेब चोरघडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावर पोलीस अधीक्षक व पोलीस उप अधीक्षक काय भूमिका बजावणार? याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण काढण्यासाठी अधीक्षक अभियंता एम. एस. आर. डी. सी. औरंगाबाद, कार्यकारी अभियंता एम.एस. आर.डी.सी. जालना, जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , मुख्याधिकारी , पोलीस निरीक्षक व आगार व्यवस्थापक ही काय भूमिका घेणार याकडेही सर्वा अस्थापनाधार काचे लक्ष लागले आहे.कळंब बस स्थानक आकुर्डी सर्व अतिक्रमण काढून आस्थापनाधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी दुकानदारात होत आहे .
 
Top