Views


*हायस्कूल लोहारा येथे ऑफलाइन टीचिंग बाबत शिक्षक दिनानिमित्त नाटिका कार्यक्रम संपन्न*


लोहारा/प्रतिनिधी


हायस्कूल लोहारा येथे ऑफलाइन टीचिंग बाबत शिक्षक दिनानिमित्त नाटिका कार्यक्रम घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड,श्रीमती निर्मला कोळी शिक्षीका यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी च्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भविष्यामध्ये होणाऱ्या ऑनलाइन टिचिंग बाबत ज्या अडचणी आहेत त्याबाबत The fun they had या पाठावर आधारित नाटिका सादर केली. यापूर्वी कोरोना काळामध्ये ऑनलाइन टिचिंग मध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी अनुभवलेल्या असून विद्यार्थ्यांना ऑफलाइन टिचिंगच आवश्यक आहे.हे नाटिकेद्वारे सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे मन जिंकले. ऑनलाइन टिचिंग म्हणजेच रोबोट द्वारे शिक्षण हे भविष्यात विद्यार्थ्यांना कसे अडचणीचे आहे याबाबत इयत्ता नववीच्या वर्गामध्ये एक धडा असून त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी रोबोट टीचिंग का नको आहे याबाबत उत्कृष्टरित्या नाटिका सादर केले.रोबोट टीचिंग म्हणजे भावना शून्य, जिवंतपणा नसणे आणि विद्यार्थ्यांना कंटाळवाणा अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.म्हणून शेवटी विद्यार्थी सर्वांनी मिळून We want offline teaching We want offline teaching असे म्हणत ऑफलाइन टीचिंगचे महत्व सांगितले.सदरच्या नाटिकेमध्ये सिद्धी माणिकशेट्टी,सुमेध सुरवसे, प्राची पाटील, सरफराज फकीर व अथर्व हासुरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सदर नाटिका यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील गोपाळ सुतार,होळकुंदे,सतीश जट्टे,आणि कोळी निर्मला यांनी परिश्रम घेतले.
 
Top