Views
*जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केला लोहारा तालुक्याचा पीक पाहणी दौरा*


लोहारा/प्रतिनिधी


उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.6 सप्टेंबर रोजी लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे मौजे बेंडकाळ,माकणी व सास्तुर येथे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या.यावेळी कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद,उपविभागीय अधिकारी गणेश पवार,तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग,मंडळ कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर यासोबतच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी चिंचोली काटे येथे वैशाली नितेश बिराजदार यांचे शेतावर मनरेगा अंतर्गत सीताफळ लागवड व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड आणि गोविंद बिराजदार यांचे शेतावर रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीची पाहणी केली.यावेळी बोलताना ते म्हणाले की,येथून पुढे शेतकऱ्याने एकात्मिक पद्धतीने शेती केली पाहिजे व सोयाबीन ची पेरणी ही टोकन व रुंद सरी वरंबा पद्धतीने केल्यास त्याचा पिकास चांगला फायदा होऊन उत्पादनात वाढ होत असल्यामुळे यापुढे अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी,असे आवाहन केले.
 
Top