*हर घर तिरंगा अभियान हे जनतेचे अभियान व्हावे - आ.राणाजगजितसिंह पाटील*
लोहारा/प्रतिनिधी
या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतोय, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. हर घर तिरंगा अभियानात सर्व शासकीय कार्यालये कर्मचारी, संघटना, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा. पंतप्रधानांनी केले आहे. याला प्रतिसाद देत देशभरात शाळा महाविद्यालयात, शासकीय कार्यालयात महिला मंडळ अशा सर्व स्तरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या नुषंगाने भारतीय जनता पार्टी लोहारा यांच्या वतीने शहरातील भारतमाता मंदिर येथे दि.7 ऑगस्ट रोजी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,उपस्थित होते. भाजपा व युवा मोर्चा यांच्या वतीने प्रभाव फेरी, मोटारसायकल रॅली, शोभायात्रा असे विविध कार्यक्रम जनजागृती करुन घेण्यात यावेत. या अभियानात तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
यावेळी सर्व प्रथम आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हसते भारतमाता प्रतिमेचे पुजन करुन बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी हर घर तिरंगा अभियानाची तपशीलवार माहिती देऊन तालुक्यात हा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तर्गे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, सतिश गिरी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, संपत देवकर, सुरेंद्र काळप्पा, युवराज जाधव, ग्रा.पं.सदस्य व्यंकट कागे, आप्पाराव पाटील, प्रमोद पोतदार, काशिनाथ घोडके, पं.स.माजी सदस्य वामन डावरे, मल्लिनाथ फावडे, कल्याण ढगे, गौरव गोसावी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.