*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवुन “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवावा*
लोहारा/प्रतिनिधी
“हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवण्यात यावा, या उपक्रमांची माहिती होण्यासाठी शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेस जनजागृती करुन विविध स्पार्धाचे व इतर उपक्रामाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन आ.ज्ञानराज चौगुले केले. या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतोय, देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे.
या अनुषंगाने व सततच्या होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नगदी पीक सोयाबीन हे वाया जात असल्याने लोहारा तहसील कार्यालयात दि.8 ऑगस्ट 2022 रोजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अमृत महोतस्वा चा लोगो असलेले बॅचेसचे अनावरन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, पोलिस निरीक्षक सुनिलकुमार काकडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, सा.बा.वि.उपअभियंता घोडके, शाखा अभियंता राजेंद्र माळी, महावितरणचें उपअभियंता शिवाजी रेड्डी, शाखा अभियंता राम दिक्षित, मोहन पणुरे, जगन्नाथ पाटील, अदि उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सततच्या भिज पावसामुळे वाया गेल्याने तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सततच्या होत असलेल्या पावसामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची आ.ज्ञानराज चौगुले यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांची समस्या तात्काळ सोडवण्यात यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना आ.ज्ञानराज चौगुले यांनी सूचना ही यावेळी केल्या. लोहारा तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे उगवण क्षमता न झाल्याने सोयाबीन पिके धोक्यात आले आहेत. तर तूर्त शेतकरी राजा धास्तावला आहे. याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी या बैठकीत लावून धरली प्रत्येक गावागावात महसूल मार्फत तलाठी व कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील, असे तहसीलदार संतोष रुईकर यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी बांधवांनी ई पिक पाहणी ॲप्लिकेशन नवीन 3.1.5 वर्जन आले असून त्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी ई पिक पाहणी ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करणे गरजेचे आहे. इ पिक पाहणी मोबाईल ॲपचा E pik pahani उपयोग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला असला तरी अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना हि पद्धत माहितीच नाही. परंतु आता जर शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद त्यांच्या सातबाऱ्यावर केली नाही तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळविण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करण्यात यावा, असे अवाहान उमरगा लोहारा मतदार संघाचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत प्रवाह बाबत अनेक गावातील शेतकऱ्यांनी समस्याचा पाडा वाचला.
यावेळी महावितरणचे शिवाजी रेड्डी व शाखा अभियंता राम दिक्षित यांनी शेतकऱ्यांचे समाधान करीत समर्पक उत्तर देत तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रत्येक निवेदन व अर्जाच्या अनुषंगाने दखल घेत लवकरच कामे मार्गी लागतील असे सांगितले. यावेळी अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, नगरसेवक अमीन सुंबेकर, जालिंदर कोकणे, कमलाकर सिरसाट, प्रताप लोभे, यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.