Views


*काजू,मनोके चोरणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*

कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील येरमाळा परिसरात चालत्या मालवाहतूक गाडी वर चढून किसमिस (मनोके),व काजू अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते या घटनेची येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
   स्थानिक गुन्हे शाखेस चोरट्या ची गुप्त माहिती मिळाली असता सोमवार (दि.08) रोजी पेट्रोलिंग करत असताना आरोपी नामे राजेंद्र छगन काळे यांनी व त्यांचे सोबत इतर साथीदार यांनी काढून चोरी केलेली त्यावरून पोस्टे येरमळा गुरन 201/22 कलम 379 भा.द.वी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाले माहितीच्या आधारे सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे 
                
या गुन्हयातील आरोपी 1राजेंद्र छगन काळे वय 48 वर्ष रा. खामकरवाडी हा मू बोरी पाटी ता वाशी ,शाम रावजी काळे ,सूरज छगन शिंदे दोघे राः लक्ष्मी पिटी ,विशाल ऊर्म भांबड्या बालाजी काळे राः कन्हेरवाडी ,उतरेश्वर दशरथ काळे राः बोरी पाटी जिल्हा उस्मानाबाद ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 
 किसमिस( मनोके)64 किलो व काजू10.500 किलो ऐकून अंदाज किंमत 27600/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 

सदर कार्यवाही ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री खनाळ साहेबयांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री मनोज निलंगेकर पोहेका. जावेद काझी, पोहेका.प्रकाश औताडे पोना. शौकत पठाण
मपोना. शेला टेळे चपोहेका. पाडूरंग मस्के यांनी केली 
 
Top