*बुवा बाबाच्या भूल थापांना बळी न पडता सत्यता पडताळा - माधव बावगे*
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३३ वा वर्धापनदिन साजरा*
कळंब/प्रतिनिधी
आपण २१ व्या शतकात आधुनिक जगामध्ये वावरत असताना कसल्याही बुवा बाबाच्या भूल थापांना बळी न पडता वास्तविक सत्य जाणून घेवून विज्ञानाच्या आधारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य समाजातील सर्व थरांपर्यंत पोहचवून संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकरांना मानवंदना देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केले. तसेच ३३ वर्षामध्ये मअंनिस ने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी सायं ७:१५ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त मअंनिसचे राज्याचे कार्याध्यक्ष माधव बावगे व राज्याचे सरचिटणीस विनायक सावळे यांच्या कळंब शाखेस भेट देवून सदस्यांशी चर्चा करण्यासाठी उस्मानाबादजिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्याचे सरचिटणीस विनायक सावळे यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या व संघटनेचे पुढील वाटचाल या विषयी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीचे प्रस्ताविक उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले तर आभार सावंत यांनी मानले.
या बैठकीस कळंब तालुका अध्यक्ष सुरेश धावारे, कार्याध्यक्ष किशन लोंढे,प्रधान सचिव संतोष लिमकर,उपाध्यक्ष प्राजक्ता पाटील,संध्या सोनटक्के,डी.एस.डोळस,जिल्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाही चे विलास कांबळे,कायदेशीर सल्लागार अँड.तानाजी चौधरी,प्रा.ईश्वर राठोड,संदीप सूर्यवंशी, अविनाश घोडके यांची उपस्थिती होती.