Views
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानगाव च्या शाळेची नाटयछटा तालुक्यात पहिली आलेल्या शाळेतील विद्यार्थी.*


कळंब/प्रतिनिधी 


 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान शाळास्तर ते जिल्हास्तर अशा चार टप्प्यात करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील पानगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली आली आहे.

सर्वप्रथम शाळास्तरावर चित्रकला, निबंधलेखन, घोषवाक्य, समूहगीत गायन, एकलगीत गायन व नाटयछटा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. शाळास्तरावर पहिला क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा केंद्रस्तरावर केंद्रिय प्राथमिक शाळा येरमाळा येथे केंद्रप्रमुख भक्तराज दिवाणे यांच्या नियंत्रणात पार पडल्या. प्रा. शा. पानगाव या शाळेच्या भारताचा स्वातंत्र्यलढा या नाटयछटेचा केंद्रात पहिला क्रमांक आला. 
बुधवार ता.१० रोजी तालुकास्तरीय नाटयछटा स्पर्धा गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर व शिक्षण विस्तार अधिकारी मंडलिक यांच्या नियंत्रणात जिल्हा परिषद कन्या प्रशाला कळंब येथे संप्पन्न झाल्या. या तालुकास्तरीय स्पर्धात प्रा. शा. पानगावच्या नाट्यछटेचा ९ केंद्रामधून प्रथम क्रमांक आला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक उमानंद भांगे व प्रणिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर, येरमाळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी व केंद्रप्रमुख भक्तराज दिवाणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.


 
Top