Views


*ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते -न्यायदंडाधिकारी महेश ठोंबरे*



कळंब/प्रतिनिधी

ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश ठोंबरे यांनी केले.

उपविभागीय पोलिस कळंब यांच्या वतीने आयोजित केलेल्या रुरल टॅलेंट हंट उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सोमवार ता.२ रोजी न्यायाधीश ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे श्री ठोंबरे म्हणाले की, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश निश्चितच मिळते हा तथाकथित अनुभव आपली परिस्थिती कशीही असली तरी आपण आपले ध्येय निश्चित करा, आपली आवड प्रकट करा, यश निश्चित मिळेल, हे करत असताना एक लक्षात ठेवा की मोबाईल चा वापर पूर्णपणे टाळा. विद्यार्थी जीवन फक्त अभ्यासात , वाचनालयात घालावा. तारुण्यात आपल्या डोक्यात या व्यतिरिक्त कुठलेही विचार येऊ देऊ नका असे आवाहन उपस्थित शिबिरारार्थी यांना केले. 
      
    पत्रकार संघाच्या चर्चेतून या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे एम.रमेश यांनी आवर्जून उल्लेख केला. प्रास्ताविकात ते म्हणाले की, या शिबिरात योग्य असे शारीरिक व बौद्धिक असे मार्गदर्शन करण्यात येणार असून याशिवाय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे अनुभव व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना आयुष्यात चांगले शिदोरी मिळणार असल्याची खात्री त्यांनी दिली.मी ही तुमच्यातील च एक आहे, फक्त परिस्थिती ला सामोरे जाऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन न्यायाधीश ठोंबरे यांनी केले.

      एक स्वप्न धरून ते पूर्नंत्वा कडे कसे न्यायचे हेच ध्येय डोक्यात ठेऊन शिबिरातील मार्गदर्शनाचे फायदे घ्या. असे मत सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी केले. ते म्हणाले की, या शिबिरात परिपूर्ण असे मार्गदर्शक असून त्याचा फायदा घ्या. कोणतेही क्षेत्र निवडा, त्यात तुम्ही समरस व्हा, यश नक्कीच मिळेल शिवाय एक महत्वाचे की, अपयश आले तर मागे सरू नका असे ही त्यांनी म्हटले.या शिबिरात उच्च अधिकारी यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन होणार आहेत.
       रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असल्याचे घोषित केले. प्रा.डॉ.सुनील पवार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बोलताना म्हणाले की, तुम्ही महाविद्यालयीन जीवन जगताना पूर्णपणे अभ्यासात घालावा.
नायब तहसीलदार सांगळे, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, गजानन पुजरवाड आदी सह पोलीस कर्मचारी, पत्रकार, प्राध्यापक व जवळपास दीडशे च्या वर महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जगदीश गवळी व अरविंद शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले.
----------------------------------




उपविभागीय पोलिस कळंब च्यावतीने आयोजित उन्हाळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, प्रा. डॉ.सुनील पवार आदी.


शिबीरातील कांहीं क्षणचित्रे





















 
Top