Views


*स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वास्तव परिस्थितीचे भान ठेवून यश संपादन करण्याची तयारी करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*


कळंब/प्रतिनिधी

स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असताना विद्यार्थ्यांनी वास्तव परिस्थितीचे भान ठेवून यश संपादन करण्यासाठी तयारी करावी- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले ते उपविभागीय पोलिस कळंब यांच्या वतीने आयोजित केलेल्या रुरल टॅलेंट हंट समर कॅम्प 2022 ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनी स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन करण्यासाठी आठ दिवसाचे निवासी मार्गदर्शन शिबिर मोहेकर ग्राउंड डिकसळ येथे आयोजित केलेल्या कॅम्प मध्ये शुक्रवार (दि.06) रोजी संवाद संभाषण करण्यात करीता उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.


 या पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पर्धा परिक्षेच्या यशाकरिता मेहनतीला पर्याय नाही. अगदी सहजपणे UPSC,MPSC मध्ये यश मिळत नाही यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व संयम बाळगणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असताना विद्यार्थ्यांकडे पर्यायी साधनाचे ही नियोजन तयार असणे गरजेचे आहे. तरच आपण जिवनात यशस्वी होऊ नियमीत शिक्षण घेत असताना स्वयंरोजगारासाठी आपल्या कडे अल्पावधीचे कोर्स करून कौशल्य प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
समाजात वावरत असताना चुकीच्या लोकांना आपला आदर्श मानू नका आपला चांगुलपणा कष्टाळू वृत्ती हाच आपला प्रभाव समाजावर पाडु शकतो. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना स्पर्धा परिक्षेत यश संपादन कसे करावयाचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी मा. एम रमेश सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभागीय अधिकारी कळंब,ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, मोहेकर काॅलेज कळंब चे प्राचार्य सुनील पवार, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास 152 नियमीत निवासी प्रशिक्षणार्थी व परिसरातील विद्यार्थी, पालक उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जगदिश गवळी यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलिस अंमलदार किरण अंभोरे प्रा. आरविंद शिंदे यांच्या सह कळंब पोलीस स्टाफ आदी परिश्रम घेतले.

 
Top