Views




*गिरवली फाट्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा,६४ लाखांचा मुद्देमाल जप्त,१६ जणांवर गुन्हा दाखल*

*सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश व पथकाची धडाकेबाज कामगिरी*


उस्मानाबाद/प्रतिनिधी


     वाशी तालुक्यातील गिरवली फाट्याजवळ मोटे यांच्या जागेत जुगार अड्डा सुरू आहे अशी माहिती मिळाली होती.. माहिती मिळताच कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.टी.मालसुरे, पोलिस नाईक शेख,तांबडे, राऊत, शिंदे,अभांरे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून मोबाईल, चारचाकी वाहने, रोकड, जुगार साहित्य असा एकूण ६३ लाख ७६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे..

याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश यांनी सांगितले की, वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिरवली फाट्याजवळ मोटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खुलेआम तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार उस्मानाबाद पोलिस अधीक्षक नीवा जैन यांच्या आदेशानुसार जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकला.

यामध्ये जहुर कमरोद्दीन काझी, प्रशांत अंगद मते, शेख अन्वर शेख महमद, पांडुरंग अंकुश मोटे, भारत नारायण ढगे, प्रकाश देवू चव्हाण, मारुती भाऊराव ढोणे, रस्तुम आशाराम लांडे, अरुण बाबुराव लाटकर, राहुल सूर्यकांत पोपले, वसंत महादेव भडाणे, शेख चाँद शेख हमीद, मनीष शांतीलाल वंच्छय, सागर सुनील राऊत, भानुदास एकनाथ उगले, राहुल शंकर खंडागळे (सर्व रा.बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



 

 
Top