Views

*50 शहरी व ग्रामीण गरीब महिला रोजगार निर्मिती व मदत करणारी स्वामिनी ब्युटी पार्लर*

कळंब/प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसर्या लाटेत सगळीकडे हाहाकार उडाला होता ग्रामीण भागासह शहरातील ही हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांना दोन वेळाचे जगणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे देण्यासारखे आहे आणि ज्याच्यामधये देण्याची वृत्ती आहे अशांनी भरभरून दिले अशा पैकीच कळंब शहरातील स्वामिनी ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मनिषा कळंबे (शिंदे) यांनी पहील्या लॉकडाऊन मध्ये नाममात्र दरात ग्रामीण व शहरी भागातील 50 महीलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण देत असताना त्यांच्या लक्षात आले की अनेक महीला नाममात्र फिस सुध्दा देऊ शकत नाहीत परंतु त्यांना जिवनात काहीतरी करण्याची इच्छा आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यांनी दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये गरजवंत ग्रामीण भागातील 20 महीला व मुलींना ब्युटी पार्लरचा बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स कोर्सचे दिड महीनयाचे मोफत प्रशिक्षण दिले सोबतच या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी ब्युटी पार्लर चा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेले एक लाख रुपयांचे साहित्याचे मोफत वाटप केले. सध्या या सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतच्या गावातच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या महीला आज त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावत आहेत.

चौकट 

मी सर्व सामान्य कुटुंबातील असल्याने मला गरीबीची व सर्वसामान्य गरजांची जाणीव आहे मी पहील्या लॉकडाऊन वेळी नाममात्र दरात प्रशिक्षण दिले त्यावेळी मला अनेक महीलांना या क्षेत्रात पुढे यायचे आहे हे दिसून आले म्हणून मी हा उपक्रम घेतला आज या महीला स्वतच्या पायावर उभा आहेत म्हणून मी समाधानी आहे. भविष्यातही मी माझ्या व्यवसायातून दैनंदिन बचत करून महीलांचे सक्षमीकरण करणार आहे.
-मनीषा कळंबे (शिंदे)

 
Top