Views


*बाल निर्मूलन कायद्याचे समाजीकरण होणे गरजेचे- डॉक्टर पवार*

कळंब/प्रतिनिधी


बाल निर्मुलन आणि बालविवाह कायद्याचे समाजीकरण होणे ही काळाची गरज असल्याचे मत मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनिल पवार यांनी व्यक्त केले.
 केंद्र बीट लोहटा पूर्व केंद्रांतर्गत तीन दिवसीय बालविवाह निर्मूलन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे शिक्षण विस्ताराधिकारी एस. बी. जगदाळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विधिज्ञ मंडळाचे कळंब तालुका अध्यक्ष ॲड. मंदार मुळीक, गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी एस.बी जगदाळे यांनी केले.
बालविवाह रोखण्यासाठी समाजामध्ये शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून कळंब तालुक्यातील गुणवत्ता वाढीचा आलेख वाढत राहत आहे. असे मत गटशिक्षण अधिकारी मधुकर तोडकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
बालविवाह आणि बालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भूमिका ठेवून आपले आचरण ठेवावे. असे मत ॲड. मंदार मुळीक यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्रप्रमुख सुब्राव कांबळे यांनी मानले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ नखाते, नारायण बाकले, अशोक कांबळे, विशाल वाघमारे, रेजाबाई पायाळ ,काकासाहेब मुंडे ,बळीराम काळे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top