Views

           
*दिव्यांगांनी शिष्यवृत्तीसाठी*
*अर्ज करण्याचे आवाहन*
 
  
उस्मानाबाद/प्रतिनिधी


 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय फेलोशिप,नि:शुल्क कोचिन.
     या योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्याच्या सबलीकरणासाठी महत्त्वाच्या शिष्यवृत्ती योजना कार्यान्वीत आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सध्यास्थितीत सहा योजना कार्यान्वीत आहेत.
     या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेण्यात यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
                            
 
Top