Views


*शिवसेनेच्या अकार्यक्षमतेला कंटाळून मौजे इटकुर ग्राम पंचायत सरपंच तथा सदस्यांचा सेनेला शेवटचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील ईटकूर ग्रामपंचायत महाविकास अघाडीचे सरपंच श्रीमती मोहराताई कसपटे , ग्रामपंचायत सदस्य , हनुमंत सोमनाथ कसपटे या दांम्पत्याने शिवसेनेला खिंडार पाडत भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उस्मानाबाद येथे दि .१० डिसेंबर रोजी माजी मंत्री आ . राणाजगजितसिंह पाटील यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. यापूर्वी
ईटकूर ग्रामपंचायतच्या १५ सदस्य संख्या पैकी ८ महा विकास अघाडीचे आणि ७ भाजपाचे असे पक्षीय बलाबल होते परंतु गाव अंतर्गतधूस फुस आणि महा विकास आघाडीच्या भोंगळ कारभारामुळे गावच्या विकासाला बसत असलेली खीळ यामुळे विकासाची ध्येयदृष्टी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या धोरणात्मक दृष्टीकोणामुळे मा . मंत्री आ . राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाविकास आघाडीचे सरपंच व ग्राप .सदस्य असलेल्या कसपटे या दांम्पत्यांनी आज भाजपा भवन उस्मानाबाद येथे जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यात नंबर २ ची असणारी ईटकूर ग्रामपंचात आता भाजपाच्या ताब्यात आली आहे .
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजाराम आडसुळ ,उपाध्यक्ष भारत जाधव ,सचिव आत्माराम रणदिवे , सदस्य ,उत्रश्वेर बुबा फरताडे ,भाग्यवंत मोरे ,यांचाही यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रवेशावेळी प्रामुख्याने ज्या पक्ष प्रवेशासाठी सिंहाचाचा वाटा असणारे तालुकाप्रमुख अजित दादा पिंगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर,बालाजी अडसूळ,अरुण चौधरी,महादेव पावले,प्रदीप फरताडे,शिवाजी अडसूळ लक्ष्मण शिंदे,सचिन गंभीरे,आबासाहेब फरताडे,
 ग्रामपंचायत सदस्य , कविता प्रदिप फरताडे , आयोध्या शिवाजी आडसुळ , आशाराणी महादेव पावले , विनोद राजेंद्र चव्हाण , आण्णा सिताराम काळे , सत्यदेव सर्जेराव कोळी,सचिन गंभीरे ,शिवाजी तात्या आडसुळ,महादेव आप्पा पावले ,मिलींद रणदिवे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top