Views


*उमरगा पोलिसांच्या ताब्यातून सराईत गुन्हेगार फरार*

उमरगा:-

पोलिसांच्या ताब्यात पण सराईत गुन्हेगार पळून गेल्याने खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधात होणार उमरगा पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे 

  याबाबत मिळालेली माहिती अशी की राजू उर्फ मधुकर पवार वय १९ रा.सारोळी ता. मोहोळ जि.सोलापूर हा सराईत गुन्हेगार पंढरपूर येथील जेलमध्ये होता. याला एका गुन्ह्याच्या तपासासाठी उमरगा पोलिसांनी ताब्यात घेऊन उमरगा येथे  चौकशी करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.

 दरम्यान दोन सराईत गुन्हेगारांना परत पंढरपूर येथील जेलमध्ये सोडण्यासाठी उमरगा पोलिस ठाण्याचे तीन पोलिसाचे पथक निघाले एस.टी संप असल्याने खाजगी वाहनातून जात होते. संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरानजीक दोन आरोपी पैकी राजू यांनी चालत्या कार मधून हिसका देत   गाडीतून उडी मारून  पळून गेला याची माहिती स्थानिक  पोलिसांना कळविण्यात आले.
 दरम्यान उमरगा पोलिसांचे एक पथक व  स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद व आरोपीस घेऊन जाणाऱ्या पोलीस  पथकाने आरोपीचा शोध शनिवारी दिवसभर येत होते मात्र आरोपी काही शोध लागला नाही.
 
Top