Views


*त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त उस्मानाबाद ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 


प्रत्येकवर्षी कार्तिक मासामध्ये येणारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून संबोधली जाते. या निमित्त उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील लिंबोणी बाग (खड्डा) येथील गणेश मंदिर परिसरातून प्रत्येक वर्षी या उस्मानाबाद ते अक्कलकोट पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे मागच्या सलग बारा वर्षांपासून ही पदयात्रा काढण्यात येते. या पदयात्रेत उस्मानाबाद व परिसरातील अनेक स्वामी समर्थ भक्त या पदयात्रेत सहभागी होतात. ही पदयात्रा तुळजापूर, ईटकळ, हंगरगा मार्गे अक्कलकोट कडे पदयात्रा मार्गस्त होते. ही पदयात्रा यावर्षी शनिवार दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उस्मानाबादेतून निघून अक्कलकोट येथे गुरुवार, दि.18 नोव्हेंबर रोजी पोहचते. या पदयात्रेच्या भक्ती सोहळ्यामध्ये अनेक भाविक भक्त सहभागी होतात.
 
Top