Views


  *येरमाळा रस्त्यालगत असलेल्या तेलगिरणीतुन लोखंडी साहित्य चोरी करीत असताना चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले*

कळंब/ प्रतिनिधी

येरमाळा रस्त्यालगत असलेले फाटक तेल गिरणीतून लोखंडी साहित्य चोरून नेताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध शनिवारी कळंब पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.
  याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील रामप्रसाद व सुजित अशोक बिश्वास (मूळ रा. ओडीशा) हे दोघे भाऊ 11 नोव्हेंबर रोजी 9 वाजता येरमाळा लगत असलेले फाटक तेलगिरणी 1.8 मीटर लोखंडी साखळी इतर 50 किलोग्राम वजनाच्या साखळ्या, 20 किलोग्राम वजनाची लोखंडी नळी आदि साहित्य चोरून नेत असताना गिरणी व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे यांना आढळून आले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना पकडून कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले .या प्रकरणी संबंधित विरोधात भादंवि कलम 379 गुन्हा नोंद करण्यात आला आहे .अधिक तपास कळंब पोलिस करीत आहेत
 
Top