Views

*“पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा”*
 
*नामांकित कंपन्याचे अधिकारी 242 पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने निवड करणार*
 
उस्मानाबाद/ प्रतिनिधी        

 सध्या राज्यभरात कोविड -19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगार, नोकरी वर्गाचा रोजगाराचा प्रश्ननिर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर अनेक कारखाने ,कंपन्या यांना आवश्यक मनुष्यबळाची मोठया प्रमाणवर कमतरता भासत आहे. या उपाय योजनांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक,कंपनी यांचेकडील 242 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष व स्त्री उमेदवारांच्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने (स्काईप ,व्हॉटसअप कॉलिंग,फोनकॉलींग) माध्यमातून मुलाखती घेउन निवड प्रकिया करणार आहेत.
          या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉबसिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील,आधार क्रमांक, मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात.
·        Jobseeker Login > Enter Aadhar Id/ Registration Id > My Profile > Pandit Dindayal Upadhyay Job Fair > District Select > Osmanabad > Click Vacancy Listing > मधून दिसणाऱ्या रिक्तपदानूसार आपल्या शैक्षणिक पातत्रेनूसार पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावे.
उद्योजकाचे नाव 1. पियाजिओ व्हेईकल्स प्रा.लि., बारामती पदाचे नाव जॉब ट्रेनी संख्या-100 शैक्षणिक पात्रता
दहावी आणि आयटीआय - पेंटर, वेल्डर,  डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, शिट मेटल वर्कर,   वय-19 ते 30. 2. यशस्वी ग्रुप ॲकडमी फॉरस्किल, पुणे. पदाचे नाव जॉब ट्रेनी / मशीन ऑपरेटर संख्या-100 शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय कोणताही ट्रेड,   बीएस्सी - केमेस्ट्री / मायक्रो. डिप्लोमा /इंजिनिरंग - इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल. वय-20 ते 26.3. LIC Of India, उस्मानाबाद. पदा
 
चे नाव Rural Career Agent संख्या-20 शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास वय-18 ते 35. Marketing Executive संख्या-20 शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास. वय-18 ते 35.4. गुरूकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, एमआयडीसी उस्मानाबाद पदाचे नाव वेल्डर/ टर्नर संख्या-2. शैक्षणिक पात्रता आयटीआय वेल्डर /टर्नर वय-18 ते 40.वेतन :- पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील. कॅन्टीन,निवास,ट्रान्सपोर्टेशन इ.सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, ऑनलाईन/फोनकॉल मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील.कार्यालयाचा संपर्कासाठी दुरध्वनी क्र :- 02472 – 222236 या  दूरध्वनीवर संपर्क करावे. दि. 22 ते 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक,कपंन्याकडून मुलाखती,निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा  दि. 22 ते 26 नोव्हेंबर 2021 या विभागाचे संकेतस्थळ https://rojgar.mahaswayam.gov.in
      तरी या ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.
                               
 
Top