*तेर शासकीय वस्तू संग्रहालय पर्यटकांसाठी खुले*
*कोविड-19 च्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे बंधनकारक*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
नॉन कंटेनमेंट क्षेत्रातीलच शासकीय वस्तुसंग्रहालये पर्यटकांकरिता खुली केली जातील.सर्व शासकीय वस्तुसंग्रहालयांमध्ये गृह मंत्रालय,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोविड-19 महामारीच्या रोग थांबविण्याकरिता वेळो-वेळी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शन सूचना लागू राहतील.
सर्व शासकीय वस्तुसंग्रहालयांमध्ये शरीराचे तापमान मोजून व सॅनिटाईज करुन पर्यटकास प्रवेश देण्यास येईल.शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट देते वेळी मास्क परिधान करणे व शारीरीक अंतर ठेवणे बंधनकारक आहे.शासकीय वस्तुसंग्रहालय अथवा परिसरात किंवा भागात प्रवेश बंदी करण्याचा अधिकार संचालनालय राखून ठेवत आहे.तसेच याठिकाणी परिसरात गर्दी करण्यास ,परिसरात थुंकण्यास,धुम्रपान करण्यास प्रदर्शित वास्तु अथवा कपाटांना हात लावण्यास मनाई राहील.
शासकीय वस्तुसंग्रहालयात नियोजित केलेल्या मार्गानेच प्रवेश करुन वस्तुसंग्रहालयास भेट देऊन नियोजित मार्गाने बाहेर जाणे बंधनकारक असेल.शासकीय वस्तुसंग्रहालयात व परिसरात कचरा करण्यास प्रतिबंध राहील.आजारी व्यक्ती यांना शासकीय वस्तुसंग्रहालय व परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.