Views


*अटलभूजल(अटल जल) योजना*
*अटल भूजल योजनांतर्गत*

 *कामकाजाविषयी क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया,दिल्ली*

*(QCI) संस्थेची क्षेत्रीय तपासणी*
 
              

उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हातंर्गत अटल भूजल योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामकाजाविषयी  क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया,दिल्ली (QCI) या केंद् स्तरीय संस्थेचे प्रतिनिधी श्री. विवेक मिश्रा यांच्याकडून  दि. 16.11.2021 रोजी खामसवाडी  गावामध्ये जलसुरक्षा आराखडयाची  प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी व सदर कामकाजाबाबतची पडताळणी करण्यात आली. सदर कामकाज पडताळणी  अनुषंगाने गावातील सरपंच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष तसेच सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी  प्रश्नावलीद्वारे चर्चा करण्यात आली व सदरबाबत ग्रामस्थांकडून योग्य माहिती प्राप्त झाल्याने क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया,दिल्ली (QCI) चे प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले.  सदर  क्षेत्रीय  पडताळणी वेळी कार्यालयीन प्रमुख श्री. एस. बी. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक(प्) , जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा अंमलबजावणी संस्था अंतर्गत कर्मचारी उपस्थित होते. 
Top