Views


*लोहारा शहरात आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि.14 नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन माजी नगरसेवक आबुलवफा कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील, बाळासाहेब पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हरि लोखंडे, भरत सुतार, पं.स.माजी सदस्य दिपक वैशाख रोडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्षा शिवमती रंजनाताई हासुरे, विमल शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे पदाअधिकारी दिपक प्रकाश रोडगे, आप्पा देवकर, हामिद पठाण, स्वप्निल माटे, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, पत्रकार गणेश खबोले, कालिदास गोरे, महेश गोरे, पोलीस पाटील तानाजी माटे, आशिष पाटील, अमोल माळी, शिवा सुतार, सरपंच सागर पाटील, बाळु सातपुते, प्रशांत थोरात, अमोल माटे, नितीन रोडगे, रवि पवार, पंडित रोडगे, आदि, उपस्थित होते.
 
Top