Views

 
*संप काळात प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी*

*उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती*
 
उस्मानाबाद/प्रतिनिधी


 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्याकरिता बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नागरिकांची गैरसोय होवू नये यास्तव संपाच्या कालावधीत प्रवाशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहने यांना प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. संप काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सहा आगार व्यवस्थापक आणि पोलिस प्रशासन यांच्याशी समन्वय साधून वाहतूक सुरु राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. नियुक्त संपर्क अधिकारी, आगार व्यवस्थापक आणि पोलिस प्रशासन यांचे नाव व संपर्क क्रमांक याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
उस्मानाबाद बसस्थानकात संपर्क अधिकारी म्हणून मोटार वाहन निरीक्षक एस.एस.शिंदे (9823276165),आगार व्यवस्थापक पी.एम.पाटील (8830114971), पोलिस निरीक्षक एस.एस.बुधवंत (9823372950), तुळजापूर बस स्थानकात मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पी.एम.उपासे (9604050930), आगार व्यवस्थापक रा.बा.दिवटे (9881075977), पोलिस निरीक्षक ए.व्ही.काशीद (9823142632), उमरगा बस स्थानकात मोटार वाहन निरीक्षक सतीश धुंदे (7775047545), आगार व्यवस्थापक प्र.वि.कुलकर्णी (7588191213), पोलिस निरीक्षक एम.बी.आघाव (9881460103), परंडा बस स्थानकात मोटार वाहन निरीक्षक प्रसाद पवार (8668425087), आगार व्यवस्थापक रा.द.वाघमोडे (9637212296), पोलिस निरीक्षक एस.डी.गिड्डे (7972071680), भूम बस स्थानकात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले (9422027557), आगार व्यवस्थापक स.सी.पंढरपूरे (7499070772), पोलिस निरीक्षक डी.एन.सुरवसे (9096542266), कळंब बस स्थानकात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संजय नकाते (7972597494), आगार व्यवस्थापक मु.रा.कोमटवार (7385189071), पोलिस निरीक्षक वाय.पी.जाधव (9823112155) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव (8275592700) यांच्या नियंत्रणाखाली या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यात अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02472-229455 असा आहे.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी कळविले आहे.
 

 
Top