*कळंब पोलिसाकडून दोन घरफोड्या व एक आठवडी बाजारातील चोरीस गेलेले मोबाईल जप्त*
कळंब/ प्रतिनिधी
तालुक्यातील डिकसळ संभाजीनगर येथे आज सकाळी पोलिसांनी छापा मारून आरोपी दीपक विलास पवार वय २५ वर्ष यास पकडून त्याच्या त्याच्याकडे चौकशी करून घराची झडती घेतली असता कळंब येथील मुकुंद धर्माधिकारी यांच्या घरफोडीतील साहित्य जप्त करण्यात आले. असून भांडी गॅस सिलेंडर खाण्याचे धान्य जप्त केले.
त्यापैकी त्याचे घरात एचपी गॅस सिलेंडर व घरातील चोरीस गेलेले भांडी भरून आले. तसेच येथील डिकसळ येथील अंगणवाडी चे कुलूप तोडून 2 एच.पी कंपनीचे गॅस सिलेंडर किंमत 6500 रुपये एकूण तीन गॅस सिलेंडर व भांडी असे एकूण 9500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच दिनांक 25. 10. 2019 रोजी आठवडी बाजारातून
भगवान गोविंद गदळे यांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
ते कळंब बस स्थानक येथे एक इसम दिनांक 26. 10 .2019 रोजी मोबाईल विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सदर आरोपी पोलिसांनी बसस्थानका वर जाऊन वैजनाथ कदम वय 24 वर्ष वर्ष रा.गांधी नगर बीड जि बीड यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळ मोबाईल हस्तगत केले.
सदर कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती निवा जैन ,अप्पर पोलीस अधीक्षक मा कावत, सहाय्यक पोलिस अधिक्षक कळंब एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस नाईक सुनील कोळेकर, फरहान पठाण ,दळवे ,मुंडे, हंगे मीनाज शेख ,मुळे, पतंगे यांनी सदरची कारवाई केली आहे.