Views


आमदार सुजितसिंह ठाकूर यांना पितृ शोक*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


      परंडा येथील ज्येष्ठ नागरीक तथा उद्योजक मानसिंह (बाबा) ठाकूर (वय 80) यांचे सोमवारी मध्यरात्री 3 वाजता पुणे येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले.
    ठाकूर यांच्या मागे पत्नी पद्मावती, मुलगा कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर यांच्यासह सुहाससिंह ठाकुर, मुलगी सुनीता ठाकूर दोन भाऊ, एक बहीण, सात  नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
    बावची रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी औसा मतदार संघाचे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार, परांडयाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अॅड.नितिन काळे, दत्ता भाऊ कुलकर्णी, अॅड.मिलिंद पाटील, रामदास कोळगे, संताजी चालुक्य, तानाजी पाटील, परंडा भाजपाचे तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, अॅड‌.जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके, सुभाषसिंह सदीवाल, बापू बनसोडे, दादासाहेब खरसडे,, सुभाषराव मोरे, रमेश परदेशी, मुकूल देशमुख, वाजित दखनी, नगरपालीकेतील नगरसेवक तसेच परंडा शहरातील व्यापारी आदिसह उस्मामाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, वाशी मतदार संघातील भाजपा व विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी अंत्यविधीसाठी उपस्थीत होते. 
 
Top