Views


*कळंब आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून उपोषण आंदोलन!*

कळंब/प्रतिनिधी

 एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवार (दि. २८) पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
कळंब येथील बस डेपोच्या कार्यालयासमोर गुरूवारी सकाळी या आंदोलनास सुरूवात होणार आहे. कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. थकीत महागाई भत्ता द्यावा, वाढीव घरभाडे आदी मागण्या चे निवेदन संयुक्त कृती समिती कळंब आगार यांच्या वतीने दि. २८ रोजी आगारात होणाऱ्या उपोषण आंदोलनाचे निवेदन आगार प्रमुख मुकेश कोमटवार आणि कळंब पोलीस खात्याला देण्यात आले. सर्व सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रथम उचल १२५०० रूपये द्यावी, दिवाळीचा बोनस १५ हजार रूपये द्यावा, २०१६ २०२० चे आर्थिक लाभ सर्व सेवानिवृत्त व सेवेतील कामगारांना देण्यात यावेत, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त कृती समितीचे निवेदन आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांना देते वेळी उमाकांत गायकवाड, अनिल बांगर, दिलप तेलंग, बळीराम कवडे ,मनोज मुळीक, उत्तरेश्वर डीसले, गोपीनाथ कांबळे, सुबोध रणदिवे, संघरक्षित गायकवाड, महेश थोरबोले ,गणेश काळे ,संध्याराणी सोनटक्के, देटे , संदीप काळे, एजास शेख, रंणजित मुंडे आदींची स्वाक्षरी आहे.
        चौकट
एसटीचे राज्य शासनात विलगीकरण, थकीत महागाई, वाढीव घरभाडे, ग्रेड पे, नियमित वेतन, वार्षिक वेतनवाढ, या मागण्या संदर्भात एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समिती २८ ऑक्टोंबरपासून बेमुदत उपोषण करत आहे. याची महाविकास आघाडी सरकार व एसटी प्रशासनाने दखल न घेतल्यास नाराज कामगार संपावर जावू शकतो.

- उमाकांत गायकवाड (आगार अध्यक्ष, एसटी कामगार संघटना कळंब आगार)
 
Top