Views


*राष्ट्रवादी जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय रक्तदान दिवस आणि जगदिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा ता.उस्मानाबाद येथे सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सास्तूर येथील जेष्ठ नागरिक ज्यांनी 98 वेळेस रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आंबेकर सर व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणिस जालिंदरभाऊ कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आबा साळुंके, संजयनाना जाधव, पत्रकार गिरीश भगत, आदि, मान्यवर उपस्थित होते. या वेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित चव्हाण, गोविंद गरड, जिवन चव्हाण, मारूती दुधभाते, सौरव भोसले, गणेश चव्हाण, आदिनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top