Views


*लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/ इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती कोव्हीड 19 चे नियम पाळून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आजादी का महोत्सव या उपक्रमा अंतर्गत जनगणमन राष्ट्रगीताचे गायन विश्वविक्रम नोंदविण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सामूहिक गायन केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी एन.एस. एस.कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. विनोद आचार्य, प्रा.डॉ. एस.व्हीं.सोनवणे, प्रा.डॉ.सोमवंशी, प्रा.ङी.एन.कोटरंगे, प्रा.प्रा.डॉ.बी.एस.राजोळे, प्रा.डी.एन.कोटरंगे, प्रा.डॉ. एस.एन.बिराजदार, प्रा.डी.व्ही.बंगले, डॉ. शिरीष देशमुख, श्री नंदकिशोर माने, श्री प्रविण पाटील, श्री परमेश्वर कदम, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top