*ज्ञानज्योती वाचनालयास श्री.प्रतिप्रसाद संस्थेकडुन पुस्तकासाठी ५००० रु.ची देणगी*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
ज्ञानज्योती बहुउध्देशिय सामाजिक संस्था व उमरगा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतस्ंस्था, उमरगा यांच्या सहकार्याने प्राथ.शिक्षक सोसा.उमरगा येथे ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा वाचनालयास, लातुर येथील श्री.प्रतिप्रसाद बहुध्देशिय सामाजिक संस्थेकडुन पुस्तक खरेदीसाठी संस्थेचे कमलाकर मोटे यांनी ५००० रु.चा धनादेश ज्ञान ज्योती बहुउध्देशिय सामाजिक संस्था अध्यक्ष तथा आमदार ज्ञानराज चौगुले व सचिव प्रदिपराव मदने यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी युवा नेते किरणभैय्या गायकवाड, उमरगा कृ.उ.बा.समिती सभापती सुल्तानशेठ, योगेश तपसाळे, युवा सेना माजी तालुका प्रमुख संदिप चौगुले, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष उपस्थित होते.