Views
*ईद ए मिलाद निमित्त शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या हस्ते फळ वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


दि. 19 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जश्ने ईद ए मिलाद निमित्त दि.13 ऑक्टोबर पासून उस्मानाबाद शहरांमध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दि.18 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ईद-ए-मिलाद कमिटीच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. व तसेच डॉ.सचिन देशमुख व डॉ.इस्माईल मुल्ला यांच्या हस्ते देखील फळ वाटप करण्यात आले. यावेळी ईद-ए-मिलाद कमिटीचे अध्यक्ष हाफिज अफजल निजामी, हाफीज अस्लम, नगरसेवक बाबा मुजावर, माजी नगरसेवक खलील (सर) सय्यद, माजी नगरसेवक अफोरोज पिरजादे, कादर पठाण, अझहर मुजावर, इर्शाद कुरेशी, कलिम कुरेशी, बिलाल तांबोळी, वाजिद पठाण, शाहनवाज सय्यद, आरेफ नाईकवाडी, इस्ताक कुरेशी, रहमत शेख, जावेद शेख, नेहाल शेख, पोलीस कॉस्टेबल बिरमवार, उपस्थित होते. दि.19 ऑक्टोबर रोजी शहरात ईद ए मिलाद निमित्ताने ताज चौक दर्गा रोड, आझाद चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. व माळी गल्ली येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ईद ए मिलाद कमिटीच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावे असे आवाहान करण्यात आले आहे.
 
Top