Views*भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेर्धात मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार परंडा यांचेमार्फत निवेदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे १२ आमदार निलंबीत केल्याच्या ‍निर्णयाच्या विरोधात भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच परंडा तालुका भाजपाच्या वतीने ‍तहसील कार्यालय परंडा येथे ‍तहसीलदार यांना पदाधिकाऱ्यांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, ओबीसी नेते स्रीमंत शेळके, बापू कोळी, वैद्यकीय आघाडीचे डाॅ. आनंद मोरे, शिवाजी पाटील, परसराम कोळी, बानगुडे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.
 
Top