Views



*भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे केलेले निलंबन रद्द करा -- भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळेे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 

ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यास असमर्थ असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने राजकीय द्वेषापोटी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन केले. हे निलंबन रद्द करण्यात यावे, याकरिता भारतीय जनता पार्टी कळंब तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ उपविभाग कळंब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, माणिक बोंदर, संजय जाधवर, गोविंद चौधरी, नारायण टेकाळे, सतपाल बनसोडे, जिव्हेश्वर कुचेकर, आबासाहेब रणदिवे, परशुराम देशमाने, सतीश वैद्य, मनोज पांचाळ, इम्रान मुल्ला, बापू माने, धम्मा वाघमारे, अशोक क्षीरसागर, कैलास सरवदे, नितीन चौधरी, स्वरूप पिंगळे, किरण फल्ले, गोविंद खाडे, पप्पू गायकवाड, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top