Views
*कळंब परिसरातील कोव्हीड रुग्णासाठी ऑक्सीजन ग्रुप कळंब कडून आणखीन एक ऑक्सीजन युक्त रुग्णवाहिका*
 
*कैलासवासी सौ. यमुनाबाई घुले यांच्या स्मरणार्थ*

कळंब (प्रतिनिधी) 

कळंब शहर व परिसरातील कोव्हीड रुग्णासाठी ऑक्सीजन ग्रुप कळंब कडून आणखीन एक ऑक्सीजन युक्त रुग्णवाहिका आज पासून सुरू करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चेतन कात्रे यांनी त्यांच्या आजी कैलासवासी सौ. यमुनाबाई घुले यांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली आहे.
या रुग्ण वाहिकेचे पूजन ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आले. या वेळी ह.भ. प. परमेश्वर महाराज बोधले, उपविभागीय अधिकारी सौ. अहिल्या गाठाळ, तहसीलदार श्री. शिंदे साहेब, जमादार साहेब, रुग्ण कल्याण समिती चे सदस्य हर्षद अंबुरे, सुशील तीर्थकर सर, चेतन कात्रे, अशोक काटे, अकीब पटेल, रोशन कोमटवार, शितल कुमार चोंदे, अक्षय घुले,सुजल घुले आदी उपस्थित होते.
 
Top