Views
*लोहारा शहरातील प्रभाग क्रं 15 मध्ये कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारणी* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माजी ग्रामपंचायत सदस्य मेहबूब गवंडी यांनी लोहारा शहरातील प्रभाग क्रं.15 मधील प्रत्येक घरा घरात, मुख्य रस्ता नाली सार्वजनिक ठिकाणी सर्व परिसरात ट्रॅक्टर द्वारे फॉगिंग मशीन ने निर्जंतुकीकरण फवारणी केली. यासह सार्वजनिक ठिकाणी ही सोडियम हैपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोनाविषाणू मुक्त वातावरण होण्यासाठी व घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावरील विषाणू घरात जाऊ नये यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना युवानेते किरण गायकवाड यांच्या सूचनेनुसार प्रभागातील घरे अंतर्गत रस्ते अंगणामध्ये हे फवारणी करण्यात येत असल्याचे महेबुब गवंडी यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, याकुब शेख, सलीम कुरेशी, पाशाभाई मुजावर, शब्बीर गंजीवाले, नजीर शेख, एजाज गवंडी, तोफीक कमाल, हारून शेख, इरफान पठाण, जहीर खुटेपड, अश्फाक शेख, उबेद सुबेकर, सद्दाम तांबोळी, शहाबुद्दीन शेख, फिरोज शेख, हयातआली शेख. यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
 
Top