Views






*बुद्ध पौर्णिमेनिमित्त रा स्व संघ जनकल्याण समिती व मुक्ती सेवा समिती च्या वतीने रक्तदान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

-कोरोना साथरोग काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये आवश्यक रूग्णांना वेळेवर रक्त मिळावे या सामाजिक भावनेने उस्मानाबाद शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि मुक्ती सेवा समितीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सर्व प्रथम बुद्ध वंदना घेऊन महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोरोना विषयक सर्व नियम पाळून मास्क सॅनिटायझर चा वापर करून हा रक्तदान शिबीर घेण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराची सुरुवात रा स्व संघाचे जिल्हा संघचालक अनिल यादव, विद्या भारती चे क्षेत्रीय कार्यकर्ते शेषाद्री डांगे, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह एडवोकेट कृष्णा मसलेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोद बाकलीकर, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉक्टर अभय शहापूरकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन विश्वास आप्पा शिंदे, लोकसेवा समितीचे कमलाकर पाटील, मुक्ती सेवा समितीचे राजेश परदेशी, प्रतीक परंडेकर, कल्याण जोशी, यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या रक्तदान शिबिरात युवक नागरिक तसेच महिला यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती कोणत्याही आपत्तीच्या काळात नागरिकांच्या आवश्यकतेनुसार धावून येते, आणि त्याप्रमाणे सेवाकार्य सुरू होते. याचाच एक भाग म्हणून आज कोरोना काळात रक्ताचा तुटवडा ची उणीव भरून काढण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह एडवोकेट कृष्णा मसलेकर यांनी यावेळी दिली. रक्तदात्यांना यावेळी जनकल्याण समितीच्या वतीने सॅनिटायझर, मास्क, कोरोना प्रतिबंधक काढा तसेच रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक महेश वडगावकर, 
जिल्हा प्रचार प्रमुख एडवोकेट महेंद्र देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह यशवंत सूर्यवंशी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शहर मंत्री शिवानी परदेशी, जनकल्याण समितीचे शंकर पांढरे , मिलिंद डावरे, प्रमोद खंडेलवाल, यांच्यासह सोलापूर येथील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे सर्व डॉक्टर्स परिचारिका कर्मचारी तसेच रा स्व संघ जनकल्याण समिती आणि संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात जवळपास 70 ते 75 महिला पुरुष युवक यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
 
Top