Views*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर, तुळजापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ.चंचला बोडके मॅडम, प्राचार्य डॉ.मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रो. गोविंद काळे, प्रा.संभाजी भोसले, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालया मध्ये आरोग्य विषयी मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापिका, विद्यार्थिनींना डॉ. सौ.चंचला बोडके मॅडम यांनी केले. प्राचार्य डॉ.मोहन बाबरे यांनी जागतिक महिला दिनाच्या इतिहास विशद केला. सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले यांनी बोलताना एकविसाव्या शतकाकडे जात असताना महिला अजून सक्षम झाल्या पाहिजे असे विचार व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी जेटीथोर यांनी आपले विचार व्यक्त करताना महिलांच्या सबलीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात कायद्याची तरतूद केली असे सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रो.डॉ.गोविंद काळे, आरोग्य अधिकारी सौ.अश्विनी मोहळकर उपस्थित होते, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.मंदार गायकवाड यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका डॉ.एस. एल.भालकरे, प्रा.डॉ.ए.आर.बिडकर, प्रा. सी.डी‌.काठेवाड, प्रा.एस.एल.कोरेकर, प्रा.स्नेहा ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नॅक समन्वक प्रा.डॉ.प्रवीण भाले, प्रा.आमोद जोशी, महादेव जाधव, राजू बनसोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार प्रा. डॉ.ए.आर.बिडकर यांनी मानले.
 
Top