Views



*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांना मदर तेरेसा चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबादच्या यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
उस्मानाबाद जिल्हा मानवी आरोग्य निर्देशांकात सकारात्मक वाढ करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.8 मार्च 2021 रोजी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे उस्मानाबाद यांना मदर तेरेसा चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या प्रेरणेतून प्राथमिक शिक्षण विभागाला प्रिंटर भेट देण्यात आला. सन2015 -16 या कालावधीत राष्ट्रीय कौटुंबीक पाहणी अहवालानुसार दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ 821 इतके होते. हा निर्देशांक उंचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सातत्याने पाऊले उचलून सदरील गुणोत्तर सन 2019 - 20 मधे थेट 229 ने वाढून 1070 पर्यंत येऊन पोहचले. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून युद्धपातळीवर अंमलबजावणी करत डेंजर झोनमधे असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाने लिंग गुणोत्तराच्या बाबतीत राज्यालाही मागे टाकले ही विशेष बाब. तसेच महत्वाच्या आठही मानवी आरोग्य निर्देशांकात सकारात्मक वाढ केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धनंजय पाटील कार्य कर्तृत्वाचा सादर सन्मानार्थ गौरव करण्यात आला. याप्रसंगी मदर तेरेसा चॅरिटेबत्त ट्रस्टचे अध्यक्ष कल्याण बेताळे, सचिव महादेव शिंदे, संचालक मोहन भोसले, संचालक डी‌.डी‌. हुंडेकरी, संचालक प्रशांत भोसले, उपस्थित होते.
 
Top