Views*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
लोहारा शहरातील ग्रामदैवत श्री महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त होणारी यात्रा व इतर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती महाशिवरात्री यात्रा महोत्सव कमिटी च्या वतीने देण्यात आली आहे. लोहारा शहरातील जुन्या गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, या ठिकाणी श्रावण महिन्यातील चारही सोमवार तसेच महाशिवरात्री दिवशी दर्शन व अभिषेक साठी भाविकांची मोठी गर्दी असते,महाशिवरात्री निमित्ताने या मंदिरात होणारे विविध कार्यक्रम ही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला,यात्रेच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून होणाऱ्या सर्व कार्यक्रमाना फाटा देऊन केवळ धार्मिक कार्यक्रम तेही कोरोना महामारीचे प्रतिबंधक उपाय पाळून करण्यात येणार आहे.
 
Top