Views


*कृषी कायदे व इंधन गॅस दरवाढीच्या निषेधार्थ लोहारा
कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन आंदोलन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

केंद्र सरकारने नविन आणलेले जाचक कायदे, इंधन व गॅस दरवाढीच्या विरोधात लोहारा कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड‌.दिपक जवळगे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अमोल पाटील, 
तालुका समन्वय माजी अध्यक्ष नागण्णा वकील,
शहराध्यक्ष के.डी.पाटील, पं.स.सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, दिपक मुळे, नगरसेवक आरिफ खानापुरे, दिपक रोडगे, कानेगावचे माजी उपसरपंच नितीन पाटील, उध्दव रणखांब, इस्माईल मुल्ला, चंद्रकांत फावडे, शंकर पाटील, आदि, उपस्थित होते.
 
Top